1677 दिवस परदेशात राहून विराट कोहलीचा दुष्काळ संपला…
बातमी शेअर करा

मुंबई, 21 जुलै: टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेनमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले आहे. कोहलीने 180 चेंडूंमध्ये 10 चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. कोहलीच्या कसोटी कारकिर्दीतील हे 29 वे शतक आहे. यासह विराटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शतकांची संख्या 76 वर पोहोचली आहे.

बऱ्याच कालावधीनंतर विराट कोहलीने परदेशात कसोटी शतक झळकावले आहे. याआधी त्याने 16 डिसेंबर 2018 रोजी पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध परदेशी भूमीवर शतक झळकावले होते. आता 1677 दिवस आणि 31 डावांनंतर विराटने परदेशात शतक ठोकले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध विराटचे हे तिसरे कसोटी शतक आहे. यापूर्वी त्याने नॉर्थ साउंड (200) आणि राजकोट कसोटी (139) शतके झळकावली होती.

कसोटीतील शतकांच्या बाबतीत कोहली आता ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमनच्या बरोबरीचा आहे. विराट कोहलीचे या वर्षातील कसोटी क्रिकेटमधील हे दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने मार्चमध्ये अहमदाबाद कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८६ धावा केल्या होत्या. फॅब फोरवर नजर टाकली तर विराटच्या पुढे फक्त स्टीव्ह स्मिथ आहे. स्मिथच्या नावावर 32, जो रूटच्या नावावर 28 आणि केन विल्यमसनच्या नावावर 28 शतकं आहेत.

Marathi News, Breaking News in Marathi first on मोठीबातमी.com . आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह बातम्यांचे अपडेट्स वाचा, प्रथम विश्वसनीय मराठी न्यूज वेबसाइट मोठीबातमी.com वर.

By मोठीबातमी टीम

'मोठी बातमी' जगातील सर्व मोठ्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ आहे . मराठी , हिंदी आणि इंग्रजी भाषे मधून दर्जेदार आणि ताज्या बातम्या आमच्या वाचका पर्यंत पोहोचविणे हे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे. नवीन टेक्नोलॉजी चा वापर करून 'मोठी बातमी' वाचकांना ताज्या घडामोडींशी अपडेट ठेवण्यास यशस्वी ठरला आहे. आज च्या समाजाला एक जबाबदार, निष्पक्ष, निडर आणि निस्वार्थी मीडिया ची गरज आहे. म्हणूनच 'मोठी बातमी' निष्पक्ष विचारधारे ने काम करण्यावर विश्वास ठेवतो. पत्रकारिते च्या मूल्यांना पूर्ण पणे समर्पित 'मोठी बातमी' ची टीम विश्वसनीयते च्या मूल्यांवर खरी उतरण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. 'मोठी बातमी' च्या वेबसाइट आणि फेसबुक पेज च्या माध्यमातून लाखो लोकांना अपडेट ठेवण्यासाठी 'मोठी बातमी' ची टीम नेहमीच तत्पर असते. follow Us On Social Media : @MothiBatmi | Use #Mothibatmi