नेहल भुरे, प्रतिनिधी
भंडारा, 21 जुलै : भंडारा जिल्ह्यातील महिला मजुरांसाठी शुक्रवार जीवघेणा ठरला. जिल्ह्यात वीज पडून दोन महिलांचा मृत्यू झाला असून 28 जण गंभीर जखमी झाले आहेत. हवामान खात्याकडून भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, हा इशारा भंडारा जिल्ह्यासाठी धोकादायक ठरला आहे.
पहिल्या घटनेत भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील चिचाळ येथे शेतात काम करणाऱ्या महिलेवर वीज पडून 25 महिला गंभीर जखमी झाल्या.
दुसरी घटना मोहाडी तालुक्यातील निलज खुर्द येथे घडली असून भात लावणीसाठी शेतात काम करण्यासाठी आलेल्या 2 महिला मजुरांवर अचानक वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही महिला झाडाखाली जेवण करत असताना अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. यावेळी महिला मजूर वचला बावनथडे वय 50 वर्षे व लता पाघे वय 50 वर्षे यांचा अचानक वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. यामध्ये ३ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हे सर्व जखमी व मृत गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नवझेरी येथील रहिवासी असून या दुर्दैवी मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.
सद्दा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात मुसळधार पावसासोबतच विजांचा कडकडाट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळेच धोका अद्याप टळला नसून भंडारा जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. मात्र आजचा शुक्रवार भंडारा जिल्ह्यासाठी जीवघेणा ठरला आहे.
Marathi News, Breaking News in Marathi first on मोठीबातमी.com . आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह बातम्यांचे अपडेट्स वाचा, प्रथम विश्वसनीय मराठी न्यूज वेबसाइट मोठीबातमी.com वर.