सिंधुदुर्गात बर्फ वाहून नेणारी बोट वेंगुर्ल्यात उलटली, दोन ठार, दोन बेपत्ता Marathi News
बातमी शेअर करा


सिंधुदुर्ग बोट: गेल्या तीन दिवसांत राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 18 जणांचा बुडून मृत्यू झाला, आता आणखी एक बोट उलटल्याची घटना समोर आली आहे. सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ले बंदरात बोट पलटी झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. दोन जण बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, वेंगुर्ले बंदरात रात्रीच्या वेळी मासेमारी बोटींसाठी बर्फ घेऊन जात असताना बोट उलटली. या बोटीत एकूण सात खलाशी होते. बोट उलटल्यानंतर तीन जण पोहत किनाऱ्यावर आले. चार जण बेपत्ता असताना त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून दोन जण अद्याप बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे.

बोट भरकटल्याने हा प्रकार घडला

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला बंदरातून रात्री मच्छिमारांसाठी आवश्यक बर्फाची वाहतूक होत असताना हा अपघात झाला. रात्री आलेल्या वादळ आणि जोरदार वाऱ्यामुळे बोट भरकटल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बेपत्ता झालेल्या खलाशांमध्ये एक रत्नागिरीचा तर तीन मध्य प्रदेशातील असल्याचे सांगण्यात येत आहे. इतर बोटींमधील खलाशांना वाचवण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली.

अजून पहा..

By

ताज्या बातम्या

error: तुम्ही बातमी कॉपी करू शकत नाही ! फक्त शेअर करा