आता सांगून पण नाल्या काढल्या नाहीत तर.. घाण मुख्य अधिकारी च्या दालनात, शिवसेनेचा ईशारा !
बातमी शेअर करा

बीड, ता.धारुर – कसबा विभागातील बर्याच ठिकाणी नाल्या तुंबल्या मुळे घानीचे साम्राज्य झाले आहे. गावातील सफाई व स्वच्छता बाबतीत पालिकेला नेहमी निवेदनच का द्यावे लागते हा प्रश्न येथील नागरीकांना पडत आहे !

सततचे निवेदने देऊन पण नालीतील तुंबलेली घाण काढली जात नसल्या मुळे, शिवसेना पदाधीकारी तालुका प्रमुख- श्री.नारायण (बाळू) कुरुंद, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष- श्री गणेश पवार यांनी धारूर नगरपालीकाचे मुख्य कार्यकारी आधिकारी यांना पुन्हा लिखीत स्वरुपात निवेदन दिले.
निवेदनाद्वारे जर येत्या 10 ऑगस्ट 2020 पर्यंत साफ सफाई झाली नाही तर सादरील घान ही कार्यालयात टाकण्यात येईल असे या निवेदनाद्वारे स्पष्ट सांगितले आहे.

धारुर मधिल सामान्य नागरीकाच्या अडी-अडचणी व स्वच्छतेच्या बाबतीत शिवसेना व त्यांचे पदाधिकारी हे नेहमीच तत्पर व जागरुक दिसून येत आहेत. त्याबद्दल गावातील ईतर सामाजिक कार्यकर्ते , रहिवाशी, व युवक वर्ग यांच्या कडून प्रशंसा केली जात आहे.

स्वराज्य नगर कसबा – पिलाजी मिल रोड वरील दोन्ही बाजूस बाभळीचे मोकार झाडे वाढले आहेत. स्वच्छता करीता व शहरातील विकास कामे साठी शासना कडून निधी उपलब्ध होऊन पण नगरपालिके कडून स्वच्छता करण्यासाठी दुर्लक्ष का केले जात आहे? अशी चर्चा स्थानिक नागरीक यांच्यात होत आहे.

स्वराज नगर कसबा येथे अश्या प्रकारे तुडुंब भरलेल्या नाल्या दिसून येत आहेत.

By मोठीबातमी टीम

'मोठी बातमी' जगातील सर्व मोठ्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ आहे . मराठी , हिंदी आणि इंग्रजी भाषे मधून दर्जेदार आणि ताज्या बातम्या आमच्या वाचका पर्यंत पोहोचविणे हे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे. नवीन टेक्नोलॉजी चा वापर करून 'मोठी बातमी' वाचकांना ताज्या घडामोडींशी अपडेट ठेवण्यास यशस्वी ठरला आहे. आज च्या समाजाला एक जबाबदार, निष्पक्ष, निडर आणि निस्वार्थी मीडिया ची गरज आहे. म्हणूनच 'मोठी बातमी' निष्पक्ष विचारधारे ने काम करण्यावर विश्वास ठेवतो. पत्रकारिते च्या मूल्यांना पूर्ण पणे समर्पित 'मोठी बातमी' ची टीम विश्वसनीयते च्या मूल्यांवर खरी उतरण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. 'मोठी बातमी' च्या वेबसाइट आणि फेसबुक पेज च्या माध्यमातून लाखो लोकांना अपडेट ठेवण्यासाठी 'मोठी बातमी' ची टीम नेहमीच तत्पर असते. follow Us On Social Media : @MothiBatmi | Use #Mothibatmi