शनिवारीही पावसाचा रेड अलर्ट, पालघरसह वसई-विरार…
बातमी शेअर करा

विजय देसाई, प्रतिनिधी

वसई, २१ जुलै : शनिवार, 22 जुलै रोजी वसई विरारसह पालघर जिल्ह्यात हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वसई विरार शहरात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने शनिवारी वसई विरारमध्येही रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून अतिवृष्टीदरम्यान उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

मुसळधार पावसाच्या काळात सखल भागात पाणी साचल्याने काही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अतिवृष्टीच्या काळात काही तातडीचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन आयुक्त अनिलकुमार पवार यांनी नागरिकांना केले आहे.

बुधवारपासून महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे गुरुवारी मुंबई, ठाणे, पालघर, वसई-विरारमध्ये शाळा बंद राहिल्या. शुक्रवारीही अनेक भागात शाळा बंद होत्या. आता खबरदारी आणि हवामान खात्याचा इशारा पाहता वसई-विरार आणि पालघरमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Marathi News, Breaking News in Marathi first on मोठीबातमी.com . आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह बातम्यांचे अपडेट्स वाचा, प्रथम विश्वसनीय मराठी न्यूज वेबसाइट मोठीबातमी.com वर.

By मोठीबातमी टीम

'मोठी बातमी' जगातील सर्व मोठ्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ आहे . मराठी , हिंदी आणि इंग्रजी भाषे मधून दर्जेदार आणि ताज्या बातम्या आमच्या वाचका पर्यंत पोहोचविणे हे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे. नवीन टेक्नोलॉजी चा वापर करून 'मोठी बातमी' वाचकांना ताज्या घडामोडींशी अपडेट ठेवण्यास यशस्वी ठरला आहे. आज च्या समाजाला एक जबाबदार, निष्पक्ष, निडर आणि निस्वार्थी मीडिया ची गरज आहे. म्हणूनच 'मोठी बातमी' निष्पक्ष विचारधारे ने काम करण्यावर विश्वास ठेवतो. पत्रकारिते च्या मूल्यांना पूर्ण पणे समर्पित 'मोठी बातमी' ची टीम विश्वसनीयते च्या मूल्यांवर खरी उतरण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. 'मोठी बातमी' च्या वेबसाइट आणि फेसबुक पेज च्या माध्यमातून लाखो लोकांना अपडेट ठेवण्यासाठी 'मोठी बातमी' ची टीम नेहमीच तत्पर असते. follow Us On Social Media : @MothiBatmi | Use #Mothibatmi