अहमदाबाद, 30 मे: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज आयपीएल 2023 चा अंतिम सामना खेळवला जात आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात व्यत्यय आल्याने आता गुजरातने चेन्नईला सामना जिंकण्यासाठी दिलेले लक्ष्य बदलले आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामाचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सुरू आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 214 धावा केल्या. विजयासाठी ठेवलेले 215 धावांचे आव्हान 20 षटकांत पूर्ण करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जचे फलंदाज मैदानात उतरले. मात्र पहिले षटक सुरू झाल्यानंतर पुन्हा मैदानावर पाऊस पडला.
पावसामुळे मैदानाचा काही भाग ओला झाला होता. त्यानंतर मैदान पूर्णपणे खेळण्यायोग्य करण्यासाठी सामना 2 तास उशिरा म्हणजे दुपारी 12:10 वाजता सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला जेणेकरून खेळ पुन्हा सुरू करताना कोणतीही अडचण येणार नाही. सामना उशिरा सुरू झाल्यामुळे हा सामना 15 षटकांचा असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता चेन्नई सुपर किंग्जला विजयासाठी 15 षटकांत 171 धावांचे लक्ष्य देण्यात आले आहे.
Marathi News, Breaking News in Marathi first on मोठीबातमी.com . आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह बातम्यांचे अपडेट्स वाचा, प्रथम विश्वसनीय मराठी न्यूज वेबसाइट मोठीबातमी.com वर.