पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधींचे प्रत्युत्तर ज्यांचा जगाचा दृष्टिकोन शाखेत तयार होतो ते गांधीजींना समजू शकत नाहीत, राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर Marathi News
बातमी शेअर करा


राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर महात्मा गांधींबद्दल जगाला सिनेमातून कळलं. रिचर्ड ॲटनबरो यांनी 1982 मध्ये ‘गांधी’ हा चित्रपट बनवला होता. यानंतर जगभरातील लोकांना महात्मा गांधींबद्दल माहिती झाली. तोपर्यंत जगाला गांधींबद्दल फारशी माहिती नव्हती, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. एबीपी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत पीएम मोदींनी महात्मा गांधींबद्दल काही दावे केले आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या दाव्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, ज्यांचा जगाचा दृष्टिकोन शाखांमध्ये तयार होतो, त्या लोकांना गांधीजी समजू शकत नाहीत. त्यांना गोडसे समजतात. ते गोडसेचा मार्ग अवलंबतात. गांधीजी संपूर्ण जगासाठी प्रेरणास्त्रोत होते. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर, नेल्सन मंडेला, अल्बर्ट आइनस्टाईन या सर्वांनी गांधींपासून प्रेरणा घेतली. भारतातील लाखो लोक गांधीजींच्या मार्गाचे अनुसरण करतात. अहिंसा आणि सत्याचा मार्ग स्वीकारा. लढाई सत्य आणि असत्याची आहे. ही हिंसा आणि लोभ यांच्यातील लढाई असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

महात्मा गांधी हे जगातील महान आत्मा होते. या 75 वर्षांत जगाला गांधीजींबद्दल सांगण्याची जबाबदारी आपली नव्हती का? त्याच्याबद्दल जगात कोणालाच माहिती नव्हती. मला माफ करा पण जेव्हा ‘गांधी’ चित्रपट बनला होता. त्यानंतर जगभरातील लोकांना महात्मा गांधींबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. जर जगाला मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला आणि इतर नेत्यांबद्दल माहिती असेल. पण गांधीजी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते. हे तुम्हाला मान्य करावे लागेल. जगभर फिरल्यानंतर मी हे सांगत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अजून पहा..By

error: तुम्ही बातमी कॉपी करू शकत नाही ! फक्त शेअर करा