मुंबई, 24 जुलै: प्रेमाला सीमा नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सीमा हैदर आपल्या प्रेमासाठी पाकिस्तानातून थेट भारतात आली. भारतातील अंजू तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात पोहोचली आहे. राजस्थानच्या भिवडी येथील अंजूने तिचा फेसबुक मित्र नसरुल्लाला भेटण्यासाठी वाघा बॉर्डरमार्गे थेट पाकिस्तान गाठले.
अंजू पाकिस्तानात गेल्याचे कळताच तिच्या पतीला धक्का बसला आहे. जयपूरला जात असल्याचे सांगून अंजू थेट पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात गेली. अंजू आणि तिचा पती अरविंद 2007 पासून भिवडी येथे राहतात. अंजू ही पाकिस्तानच्या नसरुल्लाची गेल्या चार वर्षांपासून फेसबुक फ्रेंड आहे. अंजूने तीन वर्षांपूर्वी पासपोर्टसाठी अर्ज केला होता. अंजू 90 दिवसांच्या व्हिसावर पाकिस्तानला गेली होती.
‘मी मांस खाणार नाही, गंगेत स्नान करणार’, सचिनसोबत होणार सीमाचे नवे नाटक!
न्यूज 18 च्या व्हिडिओ कॉलमध्ये अंजूने ती पाकिस्तानात का आली आहे हे सांगितले. तसेच अंजूने म्हटले आहे की, माझ्याबद्दल सुरू असलेल्या प्रेम आणि लग्नाच्या चर्चा केवळ अफवा आहेत. मी नसरुल्लाला फक्त मित्र म्हणून भेटायला आलो आहे. आमच्यातील अफेअरमध्ये काहीही तथ्य नाही. अंजूने ती लवकरच भारतात परतणार असल्याचे सांगितले आहे.
अंजू आणि नसरुल्ला यांची फेसबुकवर २०१९ मध्ये मैत्री झाली. यानंतर अंजू नसरुल्लाला भेटण्यासाठी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात गेली आहे. नसरुल्ला हे पूर्वी शाळेत शिक्षक होते, पण सध्या ते वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करतात.
Marathi News, Breaking News in Marathi first on मोठीबातमी.com . आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह बातम्यांचे अपडेट्स वाचा, प्रथम विश्वसनीय मराठी न्यूज वेबसाइट मोठीबातमी.com वर.