मुंबई, 23 जुलै, प्रशांत बाग: मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धक्कादायक माहिती देणारा फोन आला आहे. काल मध्यरात्री हा फोन आल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पांडे असे फोन करणाऱ्याचे नाव आहे. या कॉलचे लोकेशनही मुंबई परिसरात आहे.
टँकरमध्ये दहशतवादी असल्याचा दावा केला जात आहे
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, आरडीएक्सने भरलेला पांढऱ्या रंगाचा ट्रक मुंबईहून गोव्याकडे जात आहे. या टँकरमध्ये दोन पाकिस्तानी दहशतवादी प्रवास करत असल्याचा दावाही या व्यक्तीने केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी हा फोन गांभीर्याने घेतला आहे. महाराष्ट्र एटीएस आणि गोवा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ज्या व्यक्तीने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला तो पोलिसांच्या संपर्कात आहे, पोलिस आता या व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीच्या स्रोताचा शोध घेत आहेत.
Marathi News, Breaking News in Marathi first on मोठीबातमी.com . आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह बातम्यांचे अपडेट्स वाचा, प्रथम विश्वसनीय मराठी न्यूज वेबसाइट मोठीबातमी.com वर.