महाविकास आघाडीची जागा बारामती शिरूर मावळ आणि पुणे अशी आहे
बातमी शेअर करा


पुणे : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला असून शिवसेना 21 जागांवर, राष्ट्रवादी 10 जागांवर आणि काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. पुणे लोकसभा निवडणूक काँग्रेस लढवणार आहे. शिवसेना मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. शिरूर आणि बारामती हे दोन मतदारसंघ शरद पवार गटाकडून लढवले जाणार आहेत.

बारामतीमध्ये राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे, पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे संजय वाघेरे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे निवडणूक लढवणार आहेत.

अजून पहा..

error: तुम्ही बातमी कॉपी करू शकत नाही ! फक्त शेअर करा