आयपीएल 2024 मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स सामन्यापूर्वी हार्दिक पांड्या, रोहित शर्माचा व्हिडिओ शेअर केला
बातमी शेअर करा


मुंबई : आयपीएल (IPL 2024) च्या 17 व्या हंगामात मुंबई इंडियन्सला अद्याप पहिला विजय मिळवता आलेला नाही. गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभव स्वीकारावा लागला. मुंबईचा पुढचा सामना आता ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर हार्दीक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा सामना जिंकता येईल का, हे पाहणे बाकी आहे.

मुंबई इंडियन्सचा सामना 7 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा संघ कुठे गेला होता, याची माहिती समोर आली आहे. मुंबई इंडियन्सने एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली आहे. मुंबईने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कर्णधार हार्दिक पंड्या, रोहित शर्मा आणि इतर खेळाडू जामनगरला गेल्याचे समोर आले आहे. प्रवासादरम्यान ते खूप एन्जॉय करताना दिसतात.

राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यानंतर पुढील सामन्यासाठी सहा दिवसांचा अवधी होता. या सहा दिवसांच्या कालावधीत मुंबई इंडियन्स संघ सहलीवर गेल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई इंडियन्सने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली आहे.

मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा मिठी मारताना दिसत आहेत आणि बाकीचे खेळाडू वॉटर स्पोर्ट्स खेळताना दिसत आहेत. पहिल्या तीन सामन्यातील पराभवानंतर मुंबईने आपल्या खेळाडूंना तणावमुक्त ठेवण्यासाठी सहलीचे आयोजन केल्याचे सांगितले जात आहे.

पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबईची यंदाची सुरुवात चांगली झाली नाही. मुंबईला गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला. संघाच्या क्रिकेटपटूंचे मनोबल वाढवण्यासाठी मुंबईने जामनगर दौरा आयोजित केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई इंडियन्स पुनरागमन करणार का?

गेल्या आयपीएलमध्येही मुंबई इंडियन्सची कामगिरी अशीच होती. मात्र, यानंतर मुंबई इंडियन्सने पुनरागमन केले. आयपीएलच्या एका मोसमातील पहिले चार सामने गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सने पाचवा सामना जिंकून विजयी मोहिमेला सुरुवात केली आणि विजेतेपदावर नाव कोरले. पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सला नुकताच मिस्टर 360 या नावाने प्रसिद्ध असलेल्या सूर्यकुमार यादवचे संघात पुनरागमन झाल्याने दिलासा मिळाला आहे. आता तो दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मैदानात उतरणार की नाही हे पाहायचे आहे.

संबंधित बातम्या:

अजून पहा..

error: तुम्ही बातमी कॉपी करू शकत नाही ! फक्त शेअर करा