बातमी शेअर करा

हिमांशू जोशी (पिथौरागढ), 14 मे : उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार महिलांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान ही हत्या याच कुटुंबातील एकाने केली आहे. संतोष नावाच्या मुलाने ही हत्या केली आहे हत्येनंतर फरारी असलेला संतोष अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

त्याचा शोध घेण्यासाठी ड्रोनचीही मदत घेतली जात असून नेपाळला जाणाऱ्या सीमेवर विशेष पोलिसांचा पहारा आहे. वास्तविक शांत जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिथौरागढ जिल्ह्यात एका तरुणाने पत्नी, सासू, चुलत वहिनी आणि चुलत बहिणीचा धारदार शस्त्राने गळा आवळून खून केल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान एकाच वेळी चार खून झाल्याने संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण आहे.

अतिक अहमदच्या मृत्यूनंतर काळे धंदे सुरू आहेत का? वाचून तुम्हालाही बसेल धक्का

पिथौरागढ जिल्ह्यातील बरसम गावात ही घटना घडली. घटनेनंतर संतोषच्या मुलीने आरडाओरडा केल्याने आरोपी फरार झाला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. दरम्यान संतोषविरुद्ध 302 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान खून केल्यानंतर ते घराकडे आलेल्या मुलीने  वडिलांचे रक्ताने माखलेले हात पाहून मुलगी रडू लागली. आवाज आल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठलं यावेळी चारही महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या.

अर्ध्या तासात परत येतो म्हणत घरातून निघाला पण परतलाच नाही, सत्य समोर येताच परिसर हादरला

पिथौरागढचे पोलिस अधीक्षक लोकेश्वर सिंह यांनी घटनास्थळाची पाहणी केली. संतोषवर या चौघांच्या हत्येचा आरोप असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्या शोधात पथके गुंतले आहे. त्याने हे का केले हे कळू शकलेले नाही. लवकरच त्याला पकडल्यानंतर प्रकरणाचा उलगडा होईल असे ते म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी mothibatmi.comवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट mothibatmi.comवर.

By मोठीबातमी टीम

'मोठी बातमी' जगातील सर्व मोठ्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ आहे . मराठी , हिंदी आणि इंग्रजी भाषे मधून दर्जेदार आणि ताज्या बातम्या आमच्या वाचका पर्यंत पोहोचविणे हे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे. नवीन टेक्नोलॉजी चा वापर करून 'मोठी बातमी' वाचकांना ताज्या घडामोडींशी अपडेट ठेवण्यास यशस्वी ठरला आहे. आज च्या समाजाला एक जबाबदार, निष्पक्ष, निडर आणि निस्वार्थी मीडिया ची गरज आहे. म्हणूनच 'मोठी बातमी' निष्पक्ष विचारधारे ने काम करण्यावर विश्वास ठेवतो. पत्रकारिते च्या मूल्यांना पूर्ण पणे समर्पित 'मोठी बातमी' ची टीम विश्वसनीयते च्या मूल्यांवर खरी उतरण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. 'मोठी बातमी' च्या वेबसाइट आणि फेसबुक पेज च्या माध्यमातून लाखो लोकांना अपडेट ठेवण्यासाठी 'मोठी बातमी' ची टीम नेहमीच तत्पर असते. follow Us On Social Media : @MothiBatmi | Use #Mothibatmi