बॉलीवूड स्टार शाहरुख खानला उष्णतेच्या लाटेमुळे डिहायड्रेशन झाल्याने अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
बातमी शेअर करा


अहमदाबाद: सध्या आयपीएल सीझनमध्ये व्यस्त असलेला बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाहरुख खानला अतिउष्णतेमुळे त्रास होत असल्याने त्याला अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आयपीएल हंगामातील कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध हैदराबाद सनरायझर्स क्वालिफायर सामना मंगळवारी झाला. शाहरुख खानच्या मालकीच्या केकेआरने हा सामना जिंकला. यानंतर शाहरुखने स्वतः मैदानावर फेरफटका मारून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. केकेआरचा विजयही साजरा झाला. मात्र, उष्माघातामुळे शाहरुखला आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शाहरुख सध्या केकेआर संघासोबत अहमदाबादमध्ये आहे. तो यंदाच्या आयपीएल सीझनमधील मॅचेस आपल्या कुटुंबासोबत एन्जॉय करताना दिसत आहे. अहमदाबादमध्येही कडक उष्मा जाणवत असून तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. शाहरुखची आज दुपारी प्रकृती खालावल्याने त्याला अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या शाहरुख डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्याची प्रकृती ठीक आहे. उष्माघाताचा झटका आल्यानंतरच अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अजून पहा..By

error: तुम्ही बातमी कॉपी करू शकत नाही ! फक्त शेअर करा