डोंबिवली एमआयडीसीमध्ये बॉयलरचा स्फोट, भीषण आग आणि आकाशात धुराचे लोट
बातमी शेअर करा


ठाणे : डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात गुरुवारी दुपारी भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. स्फोटाचे नेमके कारण आणि तीव्रता अद्याप समजू शकलेली नाही. मात्र, डोंबिवली एमआयडीसीपासून दूरवरही काळ्या धुराचे प्रचंड लोट आकाशात दिसत आहेत. यावरून स्फोटाची तीव्रता जास्त असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एमआयडीसीतील कंपनीच्या बॉयलरमध्ये स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. एमआयडीसी फेज-2 मधील एका कंपनीत स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, एमआयडीसी परिसरातील अंबर केमिकल कंपनीच्या बॉयलरमध्ये स्फोट झाला. या कंपनीचे नाव अद्याप समजलेले नाही. मात्र, या स्फोटानंतर डोंबिवली परिसरात अनेक किलोमीटरपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे या भागातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. हा स्फोट शक्तिशाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या स्फोटात किती जणांना जीव गमवावा लागला याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या अपघातात सहा ते सात मजूर गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अजूनही येथे स्फोट होत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ही आग आणखी पसरण्याची शक्यता आहे. सध्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सध्या एमआयडीसीचा परिसर स्फोटाच्या हादऱ्यांमुळे कोलमडत असल्याचे दिसत आहे.

अजून पहा..

By

ताज्या बातम्या

error: तुम्ही बातमी कॉपी करू शकत नाही ! फक्त शेअर करा