मुंबई, 17 जुलै, विनोद राठोड: मोठी बातमी येत आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्षांची दुसरी बैठक आज बंगळुरूमध्ये होत आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहणार होते. मात्र शरद पवार यांनी अचानक आपला दौरा रद्द केला आहे. आता शरद पवार विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. शरद पवार आज मुंबईत असतील. दुसरीकडे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. अजित पवार यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर या परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पवार यांनी अचानक दौरा रद्द केल्याने चर्चेला उधाण आले आहे.
काँग्रेसने बैठक बोलावली
आज बंगळुरूमध्ये विरोधकांची आणखी एक महत्त्वाची बैठक होणार आहे. याआधी पहिली बैठक पाटण्यात झाली होती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व आहे. काँग्रेसने ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत काँग्रेससह देशातील 24 पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. मात्र शरद पवार यांनी आजचा कार्यक्रम अचानक रद्द केला आहे. शरद पवार आज मुंबईत असतील.
अजित पवार गटाने शरद पवार यांची भेट घेतली
दुसरीकडे अजित पवार यांच्या गटाने रविवारी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही भेटलो होतो, असे प्रफुल्ल पटेल यांनी उत्तर दिले. या बैठकीला अजित पवार गटातील सर्व मंत्री उपस्थित होते. आजच्या अधिवेशनात व्हीपचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
Marathi News, Breaking News in Marathi first on मोठीबातमी.com . आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह बातम्यांचे अपडेट्स वाचा, प्रथम विश्वसनीय मराठी न्यूज वेबसाइट मोठीबातमी.com वर.