लंडन, ९ जून: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने आणखी मजबूत स्थिती गाठली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १२३/४ आहे. मार्नस लबुशेने 41 धावा करून आणि कॅमेरून ग्रीन 7 धावा करून खेळत आहे. ऑस्ट्रेलियाची आघाडी आता 296 धावांची आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात शतके झळकावणाऱ्या स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडला रवींद्र जडेजाने बाद केले. उस्मान ख्वाजाला उमेश यादवने आणि डेव्हिड वॉर्नरला मोहम्मद सिराजने बाद केले.
त्याआधी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा संघ २९६ धावांवर आटोपला होता. अजिंक्य रहाणेने 89 आणि शार्दुल ठाकूरने 51 धावा केल्या. अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांनी सातव्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ३ बळी घेतले. स्टार्क, बोलंड आणि ग्रीन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. ऑफस्पिनर नॅथन लायनलाही एक विकेट मिळाली.
तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची आघाडी 300 धावांच्या जवळ असून सामन्याला आणखी दोन दिवस शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाचा पराभव अवघड दिसत आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियासाठी अनिर्णित किंवा विजय या दोनच शक्यता आहेत.
Marathi News, Breaking News in Marathi first on मोठीबातमी.com . आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह बातम्यांचे अपडेट्स वाचा, प्रथम विश्वसनीय मराठी न्यूज वेबसाइट मोठीबातमी.com वर.