नांदेड, 10 जून : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपकडून देशभर जनसंपर्क अभियान राबवले जात आहे. या मोहिमेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नांदेडमध्ये आले होते. या सभेतून अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी जनतेसमोर येऊन माझ्या 4 प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आव्हानही अमित शहांनी दिले आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात गेले नाहीत. 2019 च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी मार्ग बदलला आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले. उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवाद्यांच्या मांडीवर बसले आहेत. युतीबाबत चर्चा करायला गेल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील, असे का झाले नाही, याचे ठाकरे यांनी उत्तर दिले पाहिजे,’ अशी टीकाही अमित शहा यांनी केली.
🕖 संध्याकाळी ६.५८ | 10-06-2023 📍नांदेड | संध्याकाळी 6.58 वा. , 10-06-2023📍नांदेड लाईव्ह | माननीय केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या उपस्थितीत मोदी@9 भाजपा भव्य जनसंपर्क अभियान, नांदेड #9 YearsOfModi #नांदेड #महाराष्ट्र #अमित शहा #भाजप @AmitShah https://t.co/XPZTxhjzVk
– देवेंद्र फडणवीस (@Dev_Fadnavis) १० जून २०२३
Marathi News, Breaking News in Marathi first on मोठीबातमी.com . आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह बातम्यांचे अपडेट्स वाचा, प्रथम विश्वसनीय मराठी न्यूज वेबसाइट मोठीबातमी.com वर.
