वैभव सोनवणे प्रतिनिधी पुणे : छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. भुजबळांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. भुजबळांना धमकी देणाऱ्या व्यक्तीची पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी आरोपीने धक्कादायक खुलासा केला.
पोलीस चौकशीत आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार छगन भुजबळच नाही तर अन्य काही बडे नेतेही रडारवर होते. अजित पवार, धनंजय मुंडे यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.
शरद पवार : ‘माझ्या पुतण्याने सांगितलं…’ छगन भुजबळांचा शरद पवारांवर टोला
मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याच्या मोबाईलवर ही धमकी देण्यात आली. दरम्यान, धमकी देणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी महाड येथून ताब्यात घेतले आहे. प्रशांत पाटील असे धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव असून तो कोल्हापुरातील चंदगड येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पवार कुटुंबात भेटीगाठी वाढल्या, अजितदादा आणि पुतणे शरद पवार यांची भावाच्या घरी भेट
प्रशांत पाटील यांनी दारूच्या नशेत मंत्री छगन भुजबळ यांना धमकी दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचेही निष्पन्न झाले आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
Marathi News, Breaking News in Marathi first on मोठीबातमी.com . आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह बातम्यांचे अपडेट्स वाचा, प्रथम विश्वसनीय मराठी न्यूज वेबसाइट मोठीबातमी.com वर.