नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात बुधवारी सायंकाळी उशिरा झालेल्या चेंगराचेंगरीत चार जणांचा मृत्यू झाला.
टोकन वाटपाच्या वेळी वैकुंठ द्वार दर्शन तिकीट केंद्राजवळ चेंगराचेंगरी झाली.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू त्यांच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, चेंगराचेंगरीत भाविकांच्या मृत्यूबद्दल त्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
सीएम नायडू यांनी या घटनेतील जखमींवर करण्यात येत असलेल्या उपचाराबाबत अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. तसेच जखमींना चांगले उपचार मिळावेत यासाठी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदत करण्याचे आदेश दिले आहेत.
ही एक ब्रेकिंग स्टोरी आहे. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.